NZ vs BAN World Cup 2023 Toss Update: न्यूझीलंडने नाणेफेक जिंकुन बांगलादेशला प्रथम फलंदाजीसाठी केले अमंत्रित, पहा दोन्ही संघाची प्लेइंग 11
शुक्रवारी न्यूझीलंड विरुद्ध बांगलादेश (NZ vs BAN) यांच्यात सामना खेळवला जात आहे. दोन्ही संघांमधील हा सामना एमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई येथे भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजता होणार आहे.
विश्वचषक 2023 मध्ये (ICC Cricket World Cup 2023) शुक्रवारी न्यूझीलंड विरुद्ध बांगलादेश (NZ vs BAN) यांच्यात सामना खेळवला जात आहे. दोन्ही संघांमधील हा सामना एमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई येथे भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजता होणार आहे. 2023च्या विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडने आतापर्यंत दोन सामने खेळले आहेत. या कालावधीत किवी संघाने आपले दोन्ही सामने जिंकले आहेत. तर बांगलादेशला दोनपैकी एका सामन्यात विजय आणि एका सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. दरम्यान, न्यूझीलंडने नाणेफेक जिंकुन गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
बांगलादेश (प्लेइंग इलेव्हन): लिटन दास, तन्झिद हसन, नजमुल हुसेन शांतो, मेहिदी हसन मिराझ, शकीब अल हसन (कर्णधार), मुशफिकुर रहीम (विकेटकीपर), तौहिद हृदोय, महमुदुल्ला, तस्किन अहमद, शरीफुल इस्लाम, मुस्तफिजुर रहमान
न्यूझीलंड (प्लेइंग इलेव्हन): डेव्हॉन कॉनवे, रचिन रवींद्र, केन विल्यमसन (कर्णधार), डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, मिचेल सँटनर, मॅट हेन्री, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)