दुर्मिळ प्रकाराच्या कर्करोगाने ग्रस्त 7 वर्षीय मुलीच्या उपचारासाठी या स्टार न्यूझीलंड गोलंदाजाने घेतला पुढाकार, WTC Final जर्सी करतोय लिलाव

न्यूझीलंडच्या टिम साउदीने आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल जर्सीचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. फायनलसाठी निवडलेल्या संपूर्ण संघाद्वारे जर्सीवर स्वाक्षरी करण्यात आली असून लिलावाद्वारे जमा केलेला सर्व निधी Beattie कुटुंबियांना जाईल. 7 वर्षांची मुलगी होली बीट्टी जुलै 2018 पासून कर्करोगाच्या न्यूरोब्लास्टोमाच्या दुर्मिळ आणि आक्रमक प्रकाराने ग्रस्त आहे.

टिम साउदी WTC फायनल जर्सी लिलाव (Photo Credit: Instagram)

कारकीर्दीत प्रथमच आयसीसी ट्रॉफी (ICC Trophy) जिंकल्यानंतर न्यूझीलंडच्या (New Zealand) टिम साउदीने (Tim Southee) आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) फायनल जर्सीचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. फायनलसाठी निवडलेल्या संपूर्ण संघाद्वारे जर्सीवर स्वाक्षरी करण्यात आली आहे आणि लिलावाद्वारे जमा केलेला सर्व निधी Beattie कुटुंबियांना जाईल. 7 वर्षांची मुलगी होली बीट्टी जुलै 2018 पासून कर्करोगाच्या न्यूरोब्लास्टोमाच्या दुर्मिळ आणि आक्रमक प्रकाराने ग्रस्त आहे. दोन वर्षांहून अधिक काळ उपचार करूनही होली अद्याप या आजारापासून मुक्त झाली नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Tim Southee (@tim_southee)

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement