IRE vs NZ: न्यूझीलंडचा आयर्लंडवर 35 धावांनी विजय; उपांत्य फेरीत केला प्रवेश, विल्यमसनचे अर्धशतक
या विजयासह न्यूझीलंडचा उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. किवींचे आता पाच सामन्यांनंतर सात गुण झाले आहेत. त्याचबरोबर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचे प्रत्येकी पाच गुण आहेत.
आज सुपर-12 फेरीच्या ग्रुप वनमध्ये न्यूझीलंडचा सामना आयर्लंडशी (IRE vs NZ) होता. आणि या सामन्यात न्यूझीलंडने आयर्लंडचा 35 धावांनी पराभव केला. या विजयासह न्यूझीलंडचा उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. किवींचे आता पाच सामन्यांनंतर सात गुण झाले आहेत. त्याचबरोबर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचे प्रत्येकी पाच गुण आहेत. इंग्लंडला आपला शेवटचा सामना श्रीलंकेविरुद्ध तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध अफगाणिस्तानविरुद्ध खेळायचा आहे. जर इंग्लंडच्या संघाने श्रीलंकेचा चांगल्या फरकाने पराभव केला तर ऑस्ट्रेलियाला नेट रन रेटमध्ये इंग्लंडला पराभूत करावे लागेल. दुसऱ्या स्थानासाठी या दोन संघांमध्ये चुरशीची स्पर्धा आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांनी आपापले सामने गमावल्यास श्रीलंकेची उपांत्य फेरी गाठण्याची शक्यता वाढेल.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)