IND vs NZ 1st ODI 2022: न्यूझीलंडने पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतावर सात गडी राखून मिळवला विजय, मालिकेत 1-0 अशी आघाडी

प्रथम फलंदाजी करताना भारताने न्यूझीलंडसमोर 307 धावांचे लक्ष्य ठेवले होते.

Photo Credit - Twitter

भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील वनडे मालिकेतील पहिला सामना आज ऑकलंडमध्ये खेळवला गेला. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारताने न्यूझीलंडसमोर 307 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात केन विल्यमसन आणि टॉम लॅथम यांच्या 221 धावांच्या भागीदारीमुळे किवी संघाने सात गडी राखून लक्ष्य गाठले. या विजयासह न्यूझीलंडने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement