Nepal Beat America 2nd T20I 2024: नेपाळने दुसऱ्या टी-20 सामन्यात सुपर ओव्हरमध्ये अमेरिकेचा केला पराभव, मालिकेत 2-0 घेतली अशी आघाडी
दुसऱ्या टी-20 सामन्यात नेपाळने अमेरिकेचा थरारक सुपर ओव्हरमध्ये पराभव करत मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली. दोन्ही संघांनी पहिल्या 20 षटकात 170 धावा केल्या, त्यानंतर नेपाळने सुपर ओव्हरमध्ये 3 धावा करून विजय मिळवला.
Nepal National Cricket Team vs USA National Cricket Team Match Scorecard: नेपाळ राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध यूएसए राष्ट्रीय क्रिकेट संघ तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना 20 ऑक्टोबर (रविवार) रोजी डलास येथील ग्रँड प्रेरी स्टेडियमवर खेळला गेला. या दुसऱ्या टी-20 सामन्यात नेपाळने अमेरिकेचा थरारक सुपर ओव्हरमध्ये पराभव करत मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली. दोन्ही संघांनी पहिल्या 20 षटकात 170 धावा केल्या, त्यानंतर नेपाळने सुपर ओव्हरमध्ये 3 धावा करून विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना नेपाळने 170 धावा केल्या. ज्यामध्ये कुशल भुरटेलने चमकदार कामगिरी करत 54 चेंडूत नाबाद 92 धावा केल्या. त्यानंतर, 170 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अमेरिकेने 8 गडी गमावून बरोबरी साधली. अँड्रिज गॉसने 43 चेंडूत 62 धावा केल्या, तर सैतेजा मुक्कामल्लाने 41 चेंडूत 47 धावांचे योगदान दिले. पण ते संघाला विजयापर्यंत घेवून जावू नाही शकले.