IND W vs ENG W, 1st T20 Live Update: इंग्लंडने टीमने इंडियासमोर ठेवले 198 धावांचे मोठे लक्ष्य, नॅट सायव्हर-ब्रंट आणि डॅनिएल व्याट यांची वादळी खेळी
इंग्लंडकडून नॅट सायव्हर-ब्रंटने सर्वाधिक ७७ धावांची खेळी खेळली.
भारतीय महिला संघ आणि इंग्लंड महिला संघ यांच्यातील पहिला टी-20 वानखेडे स्टेडियमवर खेळवला जात आहे. इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाने T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टीम इंडियावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. दोन्ही संघांमध्ये 27 सामने खेळले गेले आहेत. या कालावधीत इंग्लंड संघाने 20 सामने जिंकले आहेत. दरम्यान, टीम इंडियाची कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या इंग्लंड संघाने 20 षटकांत 6 गडी गमावून 197 धावा केल्या. इंग्लंडकडून नॅट सायव्हर-ब्रंटने सर्वाधिक ७७ धावांची खेळी खेळली. टीम इंडियाकडून रेणुका ठाकूर सिंगने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. टीम इंडियाला हा सामना जिंकण्यासाठी 20 षटकात 198 धावा करायच्या आहेत.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)