Rashid Khan Catch Video: करामाती राशिद खान...., विजेच्या वेगाने धावत पकडला अप्रतिम झेल, पहा व्हिडिओ

मोहित शर्माने त्याला राशिद खानच्या (Rashid Khan) हाती झेलबाद केले. मोहित शर्माचा एक स्लो चेंडू होता आणि मिअर्स हुकसाठी गेला.

आयपीएल 2023 (IPL 2023) च्या 51 व्या सामन्यात लखनौ सुपरजायंट्सला विजयासाठी 228 धावांचे लक्ष्य देण्यात आले आहे. प्रत्युत्तरात लखनौला काइल मेयर्स आणि डिकॉक यांनी चांगली सुरुवात केली. मेयर्सने क्विकफायर 48 धावा केल्या. मोहित शर्माने त्याला राशिद खानच्या (Rashid Khan) हाती झेलबाद केले. मोहित शर्माचा एक स्लो चेंडू होता आणि मिअर्स हुकसाठी गेला. डीप स्क्वेअर लेगवर उभ्या असलेल्या राशिद खानने विजेच्या वेगाने धावत डायव्हिंग करताना अप्रतिम झेल घेतला. हवेत असलेल्या चेंडूला राशिदने दोन्ही हातांनी झेलबाद केले. हा आयपीएलमधील आतापर्यंतचा सर्वोत्तम झेल म्हटला जात आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement