TATA IPL Points Table 2025 Update: कोलकाताने हैदराबादचा पराभव करुन नोंदवला दुसरा विजय, एसआरएची शेवटच्या स्थानावर घसरण; येथे पाहा अपडेटड पॉइंट्स टेबल
कोलकाताने हैदराबादचा 80 धावांनी पराभव करत या हंगामातील दुसरा विजय नोंदवला आहे. त्याआधी, हैदराबादने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या कोलकाताने हैदराबादसमोर 201 धावांचे लक्ष्य ठेवले. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या हैदराबाद संघ 16.4 षटकात 120 धावांवर गारद झाला.
Kolkata Knight Riders vs Sunrisers Hyderabad: इंडियन प्रीमियर लीग 2025 (IPL 2025) चा 15 वा सामना आज कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (Kolkata Knight Riders vs Sunrisers Hyderabad) यांच्यात ईडन गार्डन्स, कोलकाता (Eden Gardens, Kolkata) येथे खेळवला गेला. या सामन्यात कोलकाताने हैदराबादचा 80 धावांनी पराभव करत या हंगामातील दुसरा विजय नोंदवला आहे. त्याआधी, हैदराबादने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या कोलकाताने हैदराबादसमोर 201 धावांचे लक्ष्य ठेवले. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या हैदराबाद संघ 16.4 षटकात 120 धावांवर गारद झाला. आता आयपीएल 2025 च्या पॉइंट्स टेबलमध्ये पुन्हा एकदा बदल झाला आहे. हैदराबादच्या सलग तिसऱ्या पराभवानंतर शेवटच्या स्थानावर घसरला आहे. तर कोलकाताने पाचव्या स्थानावर झेप घेतली आहे. तसेच पंजाब पहिल्या, दिल्ली दुसऱ्या, बंगळुरु तिसऱ्या आणि गुजरात चौथ्या स्थानावर आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)