KKR vs RR, IPL 2023 Match 56 Live Score Update: कोलकाताने राजस्थानला दिले दीडशे धावांचे लक्ष्य; व्यंकटेश अय्यरचे अर्धशतक, चहलने घेतले चार बळी

दोन्ही संघांमधील हा सामना कोलकाताच्या घरच्या मैदानावर असलेल्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळला जात आहे. कोलकाता नाईट रायडर्ससाठी आतापर्यंतचा हा मोसम खूप अस्थिर ठरला आहे.

RR

इंडियन प्रीमियर लीगच्या 16 व्या मोसमातील 56 वा सामना आज कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स (KKR vs RR) यांच्यात खेळला जात आहे. उभय संघांमधील हा सामना कोलकाताच्या घरच्या मैदानावर असलेल्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळला जात आहे. कोलकाता नाईट रायडर्ससाठी आतापर्यंतचा हा मोसम खूप अस्थिर ठरला आहे. कोलकाता नाईट रायडर्सने 11 सामने खेळून 5 जिंकले आहेत तर 6 सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. दुसरीकडे, या मोसमात राजस्थान रॉयल्सने पहिल्या 5 पैकी 4 सामने जिंकत शानदार सुरुवात केली. यानंतर संघाच्या कामगिरीत घसरण झाली आणि गेल्या 6 पैकी 5 सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत होणार आहे. दरम्यान, राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक हारल्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकांत आठ गडी गमावून 149 धावा केल्या. कोलकाता नाईट रायडर्सकडून व्यंकटेश अय्यरने सर्वाधिक 57 धावा केल्या आहेत. राजस्थान रॉयल्सकडून युजवेंद्र चहलने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. हा सामना जिंकण्यासाठी राजस्थान रॉयल्स संघाला 20 षटकात 150 धावा करायच्या आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement