Ishan Kishan Double Century: ईशान किशनने ठोकले ऐतिहासिक द्विशतक, सर्व विक्रम मोडले

इशान किशनने त्याच्या वनडे कारकिर्दीतील पहिले द्विशतक पूर्ण केले आहे.

Ishan Kishan (Photo Credit - Twitter)

IND vs BAN: भारत आणि बांगलादेश यांच्यातील वनडे मालिकेतील (IND vs BAN) तिसरा आणि शेवटचा सामना चट्टोग्राम येथे सुरू आहे. बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. इशान किशनने त्याच्या वनडे कारकिर्दीतील पहिले द्विशतक पूर्ण केले आहे. त्याने आतापर्यंत 126 चेंडूंत 23 चौकार आणि 9 षटकारांच्या मदतीने 200 धावा केल्या आहेत. त्याच्या या शानदार खेळीमुळे भारताची धावसंख्या 300 पुढे गेली आहे. त्याचबरोबर विराट कोहलीही शतकाच्या जवळ पोहोचला आहे. या सामन्यात तो आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 72 वे शतक पूर्ण करू शकतो.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement