IPL 2022, MI vs PBKS: मुंबईची अडखळत सुरुवात, कर्णधार Rohit Sharma पाठोपाठ ईशान किशन स्वस्तात तंबूत परत

कर्णधार रोहित शर्मा 17 चेंडूत 28 धावा करून तंबूत परतला आहे. त्याने आपल्या खेळीत 3 चौकार आणि 2 षटकार मारले. यांनतर पुढील षटकांत वैभव अरोरा याने ईशान किशनला अवघ्या 3 धावांवर माघारी धाडलं.

रोहित शर्मा, ईशान किशन (Photo Credit: Twitter/mipaltan)

IPL 2022, MI vs PBKS: पंजाब किंग्सने (Punjab Kings) दिलेल्या 199 धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाने कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या रूपात पहिली विकेट गमावली आहे. कर्णधार रोहित 17 चेंडूत 28 धावा करून तंबूत परतला आहे. त्याने आपल्या खेळीत 3 चौकार आणि 2 षटकार मारले. यांनतर पुढील षटकांत वैभव अरोरा याने ईशान किशनला (Ishan Kishan) अवघ्या 3 धावांवर माघारी धाडलं.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)