IPL 2022, MI vs DC: वानखेडेवर टॉस होताच मुंबईत पावसाला सुरुवात, सामना धुवून गेल्यास दिल्लीला होणार मोठं नुकसान

आजच्या सामन्याच्या टॉस वेळी अचानक मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाली. अशा परिस्थितीत जर पाऊस पुन्हा वानखेडेवर परतला तर दिल्लीला यामुळे मोठं नुकसान होऊ शकत. आयपीएलचा सामना अनिर्णित राहिल्यास दोन्ही संघांना 1-1 गुण मिळतात.

रोहित शर्मा आणि रिषभ पंत (Photo Credit: Twitter)

IPL 2022, MI vs DC: मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) यांच्यात आयपीएलचा सर्वात (IPL) महत्वाचा सामना खेळला जाणार आहे. या सामन्यातून प्ले ऑफमध्ये पोहोचणारा चौथा संघ कोणता असणार यावर शिक्कामोर्तब केला जाणार आहे आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघ प्लेऑफच्या अंतिम जागेसाठी रिंगणात आहे. दिल्लीचे 14 तर बेंगलोरचे 16 गुण आहे. पण आजच्या सामन्याच्या टॉस वेळी अचानक मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाली. अशा परिस्थितीत जर पाऊस पुन्हा वानखेडेवर परतला तर दिल्लीला यामुळे मोठं नुकसान होऊ शकत. आयपीएलचा सामना अनिर्णित राहिल्यास दोन्ही संघांना 1-1 गुण मिळतात. आणि असे झाल्यास दिल्लीचे 15 पॉईंट होतील आणि आरसीबी 16 गुणांसह प्ले ऑफमध्ये प्रवेश करेल.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)