Ravindra Jadeja Bows to MS Dhoni: मानलं रे तुला! ‘फिनिशर’ धोनीपुढे ‘सर जडेजा’ही नतमस्तक, मुंबई इंडियन्सवर थरारक विजयानंतर असे केले सॅल्यूट (Watch Video)

IPL 2022, MI vs CSK Highlighs: मुंबई इंडियन्स विरोधात 20 व्या षटकातील शेवटच्या 4 चेंडूत 16 धावा करून, त्याने आयपीएल 2022 च्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जला एक रोमांचक विजय मिळवून दिला आणि त्याला जगातील सर्वोत्तम फिनिशर का म्हटले जाते हे पुन्हा दाखवून दिले. सामन्यानंतर कर्णधार रवींद्र जडेजा मैदानात उतरला आणि धोनीपुढे नतमस्तक झाला.

‘फिनिशर’ धोनीपुढे ‘सर जडेजा’ नतमस्तक (Photo Credit: Twitter/IPL)

Ravindra Jadeja Bows to MS Dhoni: एमएस धोनीने (MS Dhoni) शेवटी दाखवून दिले आहे की त्याला जगातील सर्वोत्तम फिनिशर का म्हटले जाते. मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरोधात 20 व्या षटकातील शेवटच्या 4 चेंडूत 16 धावा करून, त्याने आयपीएल (IPL) 2022 च्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जला (Chennai Super Kings) एक रोमांचक विजय मिळवून दिला. कर्णधार म्हणून रवींद्र जडेजाचा (Ravindra Jadeja) आयपीएलमधला हा दुसरा विजय ठरला. तर सामना संपल्यानंतर तो मैदानावरच धोनीपुढे नतमस्तक झाला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now