IPL 2022 पूर्वी ‘तात्या’ Kieron Pollard याच्या धुवांधार फलंदाजीचा व्हिडिओद्वारे मुंबई इंडियन्सने विरोधी संघांना दिली चेतावणी, पहा Video

IPL 2022: कर्णधार रोहित शर्मा याच्या नेतृत्वात इंडियन प्रीमियर लीगची सर्वात यशस्वी फ्रँचायझी मुंबई इंडियन्स यावर्षी आपल्या जेतेपदाचा षटकार मारण्यासाठी सज्ज आहे. आयपीएलच्या 15 व्या हंगामापूर्वी पाच वेळचे चॅम्पियन मुंबई इंडियन्सने सोशल मीडियावर वेस्ट इंडिजचा धडाकेबाज अष्टपैलू किरॉन पोलार्डच्या धुवांधार फलंदाजीचा व्हिडिओ शेअर केला आणि विरोधी संघांना स्पर्धेपूर्वी चेतावणी दिली.

किरॉन पोलार्ड (Photo Credit: Twitter)

IPL 2022: कर्णधार रोहित शर्मा याच्या नेतृत्वात इंडियन प्रीमियर लीगची (Indian Premier League) सर्वात यशस्वी फ्रँचायझी मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यावर्षी आपल्या जेतेपदाचा षटकार मारण्यासाठी सज्ज आहे. आयपीएलचा (IPL) 15 वा सीजन 26 मार्चपासून भारतात खेळला जाणार आहे. पण त्यापूर्वी पाच वेळचे चॅम्पियन मुंबईने सोशल मीडियावर विंडीजचा धडाकेबाज अष्टपैलू किरॉन पोलार्डचा (Kieron Pollard) धुवांधार फलंदाजीचा व्हिडिओ शेअर केला आणि प्रतिस्पर्धी संघांना स्पर्धेपूर्वी सावधानीचा इशारा दिला.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement