IPL 2021: दिल्ली कॅपिटल्सला मोठा झटका, दक्षिण आफ्रिकेचा Anrich Nortje आढळला COVID-19 पॉसिटीव्ह

इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) मधील सर्वात यशस्वी गोलंदाजांपैकी एक दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) वेगवान गोलंदाज एनरिच नॉर्टजेची (Anrich Nortje) कोविड-19 (COVID-19) टेस्ट पॉसिटीव्ह असल्याचं समोर आलं आहे. ANI शी बोलताना घडामोडींची माहिती असलेल्या सूत्रांनी सांगितले की क्वारंटाईन असताना वेगवान गोलंदाजाची कोरोना व्हायरस टेस्ट सकारात्मक आढळली.

एनरिच नॉर्टजे (Photo Credit: PTI)

Anrich Nortje Tests COVID-19 Positive: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) मधील सर्वात यशस्वी गोलंदाजांपैकी एक दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) वेगवान गोलंदाज एनरिच नॉर्टजेची (Anrich Nortje) कोविड-19 (COVID-19) टेस्ट पॉसिटीव्ह असल्याचं समोर आलं आहे. ANI शी बोलताना घडामोडींची माहिती असलेल्या सूत्रांनी सांगितले की क्वारंटाईन असताना वेगवान गोलंदाजाची कोरोना व्हायरस टेस्ट सकारात्मक आढळली. “यापूर्वी त्याची कोविड-19 टेस्ट नकारात्मक आली होती, परंतु क्वारंटाईन सुरु असताना दुर्दैवाने आता त्याची टेस्ट सकारात्मक आली आहे,” सूत्रांनी सांगितले. दिल्ली कॅपिटल्सचा दुसऱ्या आयपीएल सामना राजस्थान रॉयल्स विरोधात होणार आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement