IPL 202, CSK vs SRH Match 17: चेन्नईच्या फलंदाजांचा फ्लॉप शो सुरूच, सनरायझर्स हैदराबाद समोर विजयासाठी 155 धावांचे लक्ष्य
IPL 202, CSK vs SRH Match 17: चेन्नई सुपर किंग्स संघाच्या फलंदाजांची खराब कामगिरी यंदाही सुरूच राहिली. सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात पहिले फलंदाजी करून सीएसकेने 7 बाद 154 धावा केल्या आणि हैदराबादसमोर विजयासाठी 155 धावांचे लक्ष्य ठेवले. चेन्नईकडून मोईन अली याने सर्वाधिक 48 धावा केल्या. दुसरीकडे, हैदराबादसाठी वॉशिंग्टन सुंदर, टी नटराजन यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या.
IPL 202, CSK vs SRH Match 17: चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाच्या फलंदाजांची खराब कामगिरी यंदाही सुरूच राहिली. सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) विरुद्धच्या सामन्यात पहिले फलंदाजी करून सीएसकेने (CSK) 7 बाद 154 धावा केल्या आणि हैदराबादसमोर विजयासाठी 155 धावांचे लक्ष्य ठेवले. चेन्नईकडून मोईन अली (Moeen Ali) याने सर्वाधिक 48 धावा केल्या. तर अंबाती रायुडूने 27 धावा आणि कर्णधार रवींद्र जडेजाने 23 धावांचे योगदान दिले. अशा परिस्थितीत, चेन्नईच्या खराब फलंदाजीनंतर आता संघाला पहिला विजय मिळवून देण्याची जबाबदार गोलंदाजांवर असेल. दुसरीकडे, हैदराबादने शानदार गोलंदाजी करून चेन्नईला मोठी धावसंख्या गाठण्यासपासून रोखले. हैदराबादकडून वॉशिंग्टन सुंदर आणि टी नटराजन यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. तर मार्को जॅन्सन, भुवनेश्वर कुमार व एडन मार्करम यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.