India Won by 42 Runs: भारताने पाचवा टी-20 सामना जिंकला, झिम्बाब्वेचा 42 धावांनी केला पराभव; मालिका 4-1 ने घातली खिशात
पाचव्या आणि शेवटच्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने झिम्बाब्वेचा 42 धावांनी पराभव केला आहे. यासह टीम इंडियाने पाच सामन्यांची टी-20 मालिका 4-1 अशी जिंकली आहे.
IND vs ZIM 5th T20I: भारत आणि झिम्बाब्वे (IND vs ZIM) यांच्यातील टी-20 मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना हरारे येथे खेळवला गेला. पाचव्या आणि शेवटच्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने झिम्बाब्वेचा 42 धावांनी पराभव केला आहे. यासह टीम इंडियाने पाच सामन्यांची टी-20 मालिका 4-1 अशी जिंकली आहे. तत्पूर्वी, पाचव्या टी-20 सामन्यात झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रझाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाने 20 षटकांत 6 गडी गमावून 167 धावा केल्या. टीम इंडियाकडून संजू सॅमसनने सर्वाधिक 58 धावांची खेळी खेळली. झिम्बाब्वेकडून आशीर्वाद मुझाराबानीने सर्वाधिक दोन बळी घेतले. लक्ष्याचा पाठलाग करताना झिम्बाब्वेचा संपूर्ण संघ 18.3 षटकांत केवळ 125 धावा करून अपयशी ठरला. झिम्बाब्वेकडून डिओन मायर्सने सर्वाधिक 34 धावा केल्या. टीम इंडियासाठी मुकेश कुमारने सर्वाधिक चार विकेट घेतल्या.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)