IND W vs AUS W 1st T20 Live Streaming: वनडेतील पराभवाचा वचपा काढण्यासाठी भारतीय महिला संघ टी-20 मध्ये भिडणार कांगारुशी, येथे पाहा थेट लाइव्ह
आता या परभवाचा वचपा काढण्यासाठी नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर (DY Patil Stadium) संध्याकाळी 7.00 वाजल्यापासून दोन्ही संघांमधील टी-20 मालिकेचे (T20 Series) सामने खेळवले जाणार आहे. आज टी-20 मालिकेतील पहिला सामना खेळवला जाणार आहे.
IND W vs AUS W 1st T20: ऑस्ट्रेलियाचा महिला क्रिकेट संघ सध्या भारत दौऱ्यावर (IND vs AUS) आहे. दोन्ही संघांमधील दौऱ्याची सुरुवात कसोटी सामन्याने झाली. या कसोटी सामन्यात भारतीय महिला संघाने ऐतिहासिक विजय नोंदवला. यानंतर दोन्ही संघांमध्ये 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात आली. ऑस्ट्रेलियन संघाने या मालिकेत 3-0 ने विजय मिळवला. आता या परभवाचा वचपा काढण्यासाठी नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर (DY Patil Stadium) संध्याकाळी 7.00 वाजल्यापासून दोन्ही संघांमधील टी-20 मालिकेचे (T20 Series) सामने खेळवले जाणार आहे. आज टी-20 मालिकेतील पहिला सामना खेळवला जाणार आहे. या टी-20 मालिकेचे स्पोर्ट्स 18 वाहिनीवर थेट प्रक्षेपण होणार आहे. त्याच वेळी, चाहते जियो सिनेमाच्या अॅप आणि वेबसाइटवर या सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग पाहू शकतात. (हे देखील वाचा: India Beat South Africa: केपटाऊन कसोटी जिंकून भारताने रचला इतिहास, मालिका 1-1 अशी बरोबरीत; सिराज-बुमराह ठरले विजयाचे हिरो)
भारतीय टी-20 संघ:
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), जेमिमाह रॉड्रिग्स, शफाली वर्मा, दीप्ती शर्मा, यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), ऋचा घोष (यष्टीरक्षक), अमनजोत कौर, श्रेयंका पाटील, मन्नत कश्यप, सायका इशाक, रेणुका सिंग ठाकूर, तीतस साधू, पूजा वस्त्राकर, कनिका आहुजा, मिन्नू मणी.
टी-20 मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघ:
एलिसा हिली (कर्णधार), डार्सी ब्राउन, हेदर ग्रॅहम, ऍशले गार्डनर, किम गर्थ, ग्रेस हॅरिस, जेस जोनासेन, अलाना किंग, फोबी लिचफिल्ड, ताहलिया मॅकग्रा (व्हीसी), बेथ मूनी (विकेटकीपर), एलिस पेरी, मेगन शूट, अॅनाबेल सदरलँड , जॉर्जिया वेअरहॅम.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)