IND vs PAK: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी टीम इंडियाने केला इनडोअर सराव, केएल राहुलही आला दिसुन; पहा फोटो
बीसीसीआयने आपल्या सोशल मीडिया ट्विटर अकाउंटवर टीम इंडियाच्या इनडोअर सरावाची फोटो शेअर केली आहेत. या फोटोमध्ये कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, शार्दुल ठाकूर, शुभमन गिल आणि उपकर्णधार हार्दिक पांड्या दिसत आहेत.
पाकिस्तान (IND vs PAK) विरुद्धच्या सामन्यापूर्वी टीम इंडियाने (Team India) कोलंबो येथील एनसीसीमध्ये इनडोअर सराव सुरू केला आहे. यावेळी स्टार यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुलही इनडोअर नेटमध्ये सराव करताना दिसला. बीसीसीआयने आपल्या सोशल मीडिया ट्विटर अकाउंटवर टीम इंडियाच्या इनडोअर सरावाची फोटो शेअर केली आहेत. या फोटोमध्ये कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, शार्दुल ठाकूर, शुभमन गिल आणि उपकर्णधार हार्दिक पांड्या दिसत आहेत. वास्तविक, सुपर-4 मध्ये भारताला पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध खेळायचा आहे. यासाठी संघाने आतापासून सरावाला सुरुवात केली आहे. वास्तविक, आशिया चषक 2023 चा सुपर-4 सामना भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात रविवार, 10 सप्टेंबर रोजी श्रीलंकेत होणार आहे. मात्र, यापूर्वी भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता.
पहा फोटो
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)