IND vs ENG, World Cup 2023 Live Score Update: टीम इंडियाला सुरवातीलाच दोन धक्के, शुभमन गिल आणि विराट कोहली स्वस्तात बाद

लखनौच्या इकाना स्टेडिअमवर भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये लढत होणार आहे. इंग्लंड संघाला स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी आजच्या सामन्यात विजय अनिवार्य आहे,

आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 चा 29 वा सामना आज लखनौमध्ये टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यात खेळला जात आहे. लखनौच्या इकाना स्टेडिअमवर भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये लढत होणार आहे. इंग्लंड संघाला स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी आजच्या सामन्यात विजय अनिवार्य आहे, दुसरीकडे टीम इंडियाने आजचा सामना जिंकला तर सेमीफायनलचे तिकिट निश्चित होणार आहे. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या टीम इंडियाला पहिला मोठा झटका बसला. सलामीवीर शुभमन गिल 9 धावा करून ख्रिस वोक्सचा बळी ठरला.  तर विराट कोहली हा शुन्य धावांवर बाद झाला. टिम इंडियाचा स्कोर 27/2.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement