MI vs RR, IPL 2023 Live Score Update: राजस्थान रॉयल्स संघाला पहिला मोठा धक्का, सलामीवीर जोस बटलर पॅव्हेलियनमध्ये परतला

दोन्ही संघांमधील हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला जात आहे. आयपीएलच्या इतिहासात मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स हे संघ 28 वेळा आमनेसामने आले आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सचा वरचष्मा असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.

इंडियन प्रीमियर लीगच्या 16 व्या मोसमातील 42 वा सामना आज मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळला जात आहे. दोन्ही संघांमधील हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला जात आहे. आयपीएलच्या इतिहासात मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स हे संघ 28 वेळा आमनेसामने आले आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सचा वरचष्मा असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. सध्या राजस्थान रॉयल्स पॉइंट टेबलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे तर मुंबई इंडियन्स आठव्या क्रमांकावर आहे. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत होणार आहे. दरम्यान, राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या राजस्थान रॉयल्स संघाला पहिला मोठा धक्का बसला. सलामीवीर जोस बटलर 18 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. राजस्थान रॉयल्स संघाचा स्कोअर 72/1.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement