IPL 2023, Match 14 SRH vs PBKS Live Streaming Online: पहिल्या विजयाच्या शोधात हैदराबादचा संघ पंजाबविरुद्ध उतरणार मैदानात, कुठे पाहणार सामना? घ्या जाणून

या सामन्यापूर्वी पंजाब किंग्जचे पारडे जड आहे. या संघाने स्पर्धेतील आतापर्यंतचे दोन्ही सामने जिंकले आहेत. तर सनरायझर्स हैदराबाद संघाने विजयाचे खातेही उघडलेले नाही. हैदराबाद संघाने आतापर्यंत दोन सामने खेळले असून दोन्ही सामन्यात त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

SRH vs PBKS (Photo Credit - Twitter)

इंडियन प्रीमियर लीग 2023 मध्ये दररोज अनेक रोमांचक सामने खेळले जात आहेत. या भागात रविवारी पंजाब किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद (PBKS vs SRH) यांच्यात सामना होणार आहे. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना होणार आहे. सामना संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल आणि नाणेफेक संध्याकाळी 7 वाजता होईल. या सामन्यापूर्वी पंजाब किंग्जचे पारडे जड आहे. या संघाने स्पर्धेतील आतापर्यंतचे दोन्ही सामने जिंकले आहेत. तर सनरायझर्स हैदराबाद संघाने विजयाचे खातेही उघडलेले नाही. हैदराबाद संघाने आतापर्यंत दोन सामने खेळले असून दोन्ही सामन्यात त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. दरम्यान, पंजाब किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्सवर पाहता येईल. हा सामना तुम्ही मोबाईलवर जिओ सिनेमावर पाहू शकता.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement