SRH vs MI Live Score Updates: हैदराबादचे मुंबईसमोर 201 धावांचे लक्ष्य, मयंक-विव्रतचे अर्धशतक

प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने 20 षटकांत 5 गडी गमावून 200 धावा केल्या.

आज आयपीएल 2023 चा 69 वा सामना मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद (MI vs SRH) यांच्यात वानखेडे स्टेडियमवर खेळला जात आहे. नाणेफेक जिंकून मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने 20 षटकांत 5 गडी गमावून 200 धावा केल्या. एसआरएचसाठी मयंक अग्रवालने 46 चेंडूत 83 धावांची शानदार खेळी केली. आणि विव्रत शर्माने 47 चेंडूत 69 धावा केल्या. मुंबईकडून आकाश मधवालने 4 बळी घेतले. त्याचवेळी ख्रिस जॉर्डनला ब्रेकथ्रू मिळाला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)