IPL 2023 Point Table: हैदराबादने राजस्थानचा चार गडी राखून केला पराभव, ईथे पहा पॉइंट टेबलची स्थिती
प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने 2 बाद 214 धावा केल्या. प्रत्युत्तरात हैदराबादने सहा गडी गमावून 217 धावा केल्या आणि सामना चार विकेटने जिंकला. अब्दुल समदने शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकत आपल्या संघाला विजय मिळवून दिला.
सनरायझर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्सचा (SRH vs RR) चार गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने 2 बाद 214 धावा केल्या. प्रत्युत्तरात हैदराबादने सहा गडी गमावून 217 धावा केल्या आणि सामना चार विकेटने जिंकला. अब्दुल समदने (Abdul Samad) शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. तत्पूर्वी, संदीप शर्माने (Sandeep Sharma) त्याला बाद केले, पण तो नो-बॉल ठरला आणि समदने फ्री हिटमध्ये षटकार ठोकत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. राजस्थानकडून जोस बटलरने 95 आणि संजू सॅमसनने 66 धावा केल्या. त्याचवेळी हैदराबादकडून अभिषेक शर्माने 55 आणि राहुल त्रिपाठीने 47 धावा केल्या. अखेरीस, ग्लेन फिलिप्सने सात चेंडूत 25 धावा करत आपल्या संघाला विजयाच्या उंबरठ्यावर आणले आणि समदने सात चेंडूत 17 धावा करत हैदराबादला विजय मिळवून दिला. या विजयासह हैदराबादचा संघ प्लेऑफमध्ये कायम आहे. हैदराबादचे 10 सामन्यांनंतर आठ गुण आहेत.
ईथे पहा पॉइंट टेबलची स्थिती
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)