How To Watch ENG vs OMN, 28th Match Live Streaming: इंग्लंड आणि ओमान यांच्यात होणार हाय व्होल्टेज सामना, जाणून घ्या केव्हा अन् कुठे पाहणार लाइव्ह
ओमानचा संघ आधीच या स्पर्धेतून बाहेर पडला आहे. गतविजेत्या इंग्लंडला स्पर्धेत कायम राहण्यासाठी हा सामना जिंकणे अत्यंत महत्त्वाचे आहे. इंग्लंडचा पहिला सामना स्कॉटलंडविरुद्ध होता आणि तो पावसामुळे वाहून गेला. इंग्लंडही एका गुणासह गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. जर इंग्लंडने हा सामना जिंकला तर तो नामिबियाला मागे टाकून गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर पोहोचेल.
ENG vs OMN T20 World Cup 2024: टी-20 विश्वचषक 2024 चा 28 वा सामना (T20 World Cup 2024) आज इंग्लंड आणि ओमान (ENG vs OMN) यांच्यात होणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 12.30 वाजता अँटिग्वामधील नॉर्थ साउंड येथील सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियमवर खेळवला जाईल. ओमानचा संघ आधीच या स्पर्धेतून बाहेर पडला आहे. गतविजेत्या इंग्लंडला स्पर्धेत कायम राहण्यासाठी हा सामना जिंकणे अत्यंत महत्त्वाचे आहे. इंग्लंडचा पहिला सामना स्कॉटलंडविरुद्ध होता आणि तो पावसामुळे वाहून गेला. इंग्लंडही एका गुणासह गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. जर इंग्लंडने हा सामना जिंकला तर तो नामिबियाला मागे टाकून गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर पोहोचेल. या विश्वचषकात ओमानला अद्याप एकही विजय मिळवता आलेला नाही. हा सामना हॉटस्टार ॲपवर थेट प्रक्षेपित केला जाईल आणि स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर या सामन्याचा आनंद घेता येईल.