PBKS vs RCB, IPL 2024 Live Score Update: पंजाब किंग्जचा अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला, लियाम लिव्हिंगस्टोनला स्वप्नील सिंगने केले बाद
प्रथम फलंदांजीसाठी आलेल्या आरसीबीने पंजाबसमोर 242 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. आरसीबीकडून विराट कोहलीने सर्वाधिक 92 धावा केल्या. तर, दुसरीकडे पंजाबकडून हर्षल पटेल सर्वाधिक तीन विकेट घेतल्या आहे. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या पंजाबला पाचवा धक्का लागला आहे.
PBKS vs RCB, IPL 2024: आयपीएल 2024 चा 58 वा (IPL 2024) सामना पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB vs PBKS) यांच्यात धर्मशाला येथील एचपीसीए क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांनी आतापर्यंत 11 सामने खेळले असून दोन्ही संघांनी प्रत्येकी चार विजय नोंदवले आहेत. प्लेऑफच्या शर्यतीत राहण्यासाठी त्यांना पुढील तीन सामने जिंकणे आवश्यक आहे. मात्र आजच्या सामन्यात एक संघ बाद होणार आहे. दरम्यान, पंजाब किंग्जने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध गोलंदांजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदांजीसाठी आलेल्या आरसीबीने पंजाबसमोर 242 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. आरसीबीकडून विराट कोहलीने सर्वाधिक 92 धावा केल्या. तर, दुसरीकडे पंजाबकडून हर्षल पटेल सर्वाधिक तीन विकेट घेतल्या आहे. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या पंजाबला पाचवा धक्का लागला आहे. पंजाबचा स्कोर 146/5