Gujarat Beat Punjab: गुजरातने पंजाबच्या तोंडून विजय हिसकावला, तीन गडी राखून केला पराभव; तेवतियाने 32 धावांची मॅच विनिंग इनिंग खेळली

या सामन्यात गुजरातने पंजाबचा 3 गडी राखून पराभव केला आहे.

PBKS

PBKS vs GT, IPL 2024 37th Match: आज इंडियन प्रीमियर लीग 2024 चा 37 वा (IPL 2024) सामना पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स (PBKS vs GT) यांच्यात मुल्लानपूर येथील महाराजा यादवेंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात गुजरातने पंजाबचा 3 गडी राखून पराभव केला आहे. तत्तपुर्वी, पंजाब किंग्जचा कर्णधार सॅम कुरनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेवून गुजरातसमोर 143 धांवांचे लक्ष्य ठेवले होते. पंजाबकडून सलामीवीर प्रभसिमरन सिंगने सर्वाधिक 35 धावा केल्या. गुजरातकडून रविश्रीनिवासन साई किशोरने सर्वाधिक चार बळी घेतले. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या गुजरात टायटन्सने शेवटच्या षटकात हा सामना नावावर केला. गुजरात टायटन्ससाठी स्टार फलंदाज राहुल तेवतियाने सर्वाधिक 36 नाबाद धावांची खेळी खेळली. पंजाब किंग्जकडून हर्षल पटेलने सर्वाधिक तीन बळी घेतले.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement