DC-W vs GG-W 20th Match Live Score Update: गुजरात जायंट्सची कर्णधार बेथ मुनीने नाणेफेक जिंकली, प्रथम फलंदाजी करण्याचा घेतला निर्णय

आज या मोसमातील 20 वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात जायंट्स यांच्यात खेळला जात आहे. दोन्ही संघांमधील हा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जात आहे.

DC vs GG (Photo Credit - X)

DC-W vs GG-W 20th Match: महिला प्रीमियर लीगच्या या दुसऱ्या सत्रात दररोज रोमांचक सामने होत आहेत. आता लीगमध्ये फक्त एकच सामना शिल्लक आहे. आज या मोसमातील 20 वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात जायंट्स यांच्यात खेळला जात आहे. दोन्ही संघांमधील हा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जात आहे. यानंतर एलिमिनेटर सामना खेळवला जाईल. दरम्यान, गुजरात जायंट्सची कर्णधार बेथ मुनीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

दिल्ली कॅपिटल्स: मेग लॅनिंग (कर्णधार), शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, ॲलिस कॅप्सी, मारिझान कॅप, जेस जोनासेन, राधा यादव, अरुंधती रेड्डी, तानिया भाटिया (विकेटकीपर), शिखा पांडे, मिन्नू मणी.

गुजरात जायंट्स: लॉरा वोल्वार्ड, बेथ मुनी (विकेटकीपर/कर्णधार), डेलन हेमलता, फोबी लिचफिल्ड, ऍशले गार्डनर, भारती फुलमाली, कॅथरीन ब्राइस, तनुजा कंवर, शबनम एमडी शकील, मेघना सिंग, मन्नत कश्यप.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement