Sarfaraz Khan Debut: शेवटी बापालाच काळजी! सरफराज खानच्या वडिलांनी मुलासाठी कर्णधार रोहित शर्माला केली खास विनंती (Watch Video)
पदार्पणाची कॅप मिळाल्यानंतर सरफराजचे वडील ज्या पद्धतीने भावूक झाले त्याचा व्हिडिओ सर्वांनी पाहिला. आता आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये सरफराजचे वडील भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) आपल्या मुलाची काळजी घेण्यास सांगत आहेत.
IND vs ENG 3rd Test: सरफराज खानच्या (Sarfaraz Khan Debut) पदार्पणाची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. पदार्पणाची कॅप मिळाल्यानंतर सरफराजचे वडील ज्या पद्धतीने भावूक झाले त्याचा व्हिडिओ सर्वांनी पाहिला. आता आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये सरफराजचे वडील भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) आपल्या मुलाची काळजी घेण्यास सांगत आहेत. दरम्यान, एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा सरफराजचे वडील आणि सरफराजच्या पत्नीचे अभिनंदन करत आहे. यादरम्यान सरफराजच्या वडिलांनी रोहित शर्माला सांगितले, सर, ध्यान रखना उसका, रोहित शर्मा- अरे सर, बिल्कुल बिल्कुल. सरफराजने पदार्पणाच्या कसोटी सामन्यातही चांगली कामगिरी केली आणि झटपट अर्धशतक झळकावले. सरफराजने 66 चेंडूत 62 धावांची शानदार खेळी केली. मात्र, तो दुर्दैवी ठरला आणि रवींद्र जडेजाच्या चुकीच्या कॉलमुळे तो धावबाद झाला. अशा प्रकारे बाद झाल्याने रोहित शर्मा चांगलाच संतापलेला दिसत होता.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)