ICC Men’s Test Cricketer of the Year: इंग्लंडचा बेन स्टोक्स ठरला 'टेस्ट क्रिकेटर ऑफ द इयर', अष्टपैलू खेळाडू म्हणून केली चमकदार कामगिरी
यादरम्यान बेन स्टोक्सने 870 धावा केल्या आणि 26 विकेट्सही घेतल्या.
आयसीसीने (ICC) धडाकेबाज खेळ दाखविल्याबद्दल 2022 मध्ये टेस्ट क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार जिंकणाऱ्या खेळाडूचे नाव जाहीर केले आहे. इंग्लंडचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्सची (Ben Stokes) 'आयसीसी पुरुष कसोटी क्रिकेटर ऑफ द इयर-2022' म्हणून (Test Cricketer of the Year) निवड झाली आहे. गेल्या वर्षी, बेन स्टोक्सने 15 कसोटी सामने खेळताना बॅट आणि चेंडूने चमकदार कामगिरी केली होती. यादरम्यान बेन स्टोक्सने 870 धावा केल्या आणि 26 विकेट्सही घेतल्या. हा मोठा क्रिकेट पुरस्कार मिळविण्याच्या शर्यतीत बेन स्टोक्सने आपला सहकारी जॉनी बेअरस्टो, ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर उस्मान ख्वाजा आणि दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा यांना मागे टाकले आहे. गेल्या महिन्यात बेन स्टोक्ससोबत या तिन्ही खेळाडूंनाही या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)