ENG vs AUS ICC World Cup 2023 Toss Update: इंग्लंडने ऑस्ट्रेलियाविरुद्ध नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय
इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाने सहापैकी चार सामने जिंकले असून त्यांचे आठ गुण आहेत. दुसरीकडे, इंग्लंडने सहापैकी पाच सामने गमावले आहेत. त्याचे फक्त दोन गुण आहेत.
विश्वचषकाच्या 36व्या सामन्यात ऑस्ट्रेलियासमोर इंग्लंडचे आव्हान (ENG vs AUS) आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दोन्ही संघांमधील हा सामना खेळला जात आहे. इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाने सहापैकी चार सामने जिंकले असून त्यांचे आठ गुण आहेत. दुसरीकडे, इंग्लंडने सहापैकी पाच सामने गमावले आहेत. त्याचे फक्त दोन गुण आहेत. त्याचबरोबर आज जर इंग्लंडचा संघ पराभूत झाला तर तो अधिकृतपणे स्पर्धेतून बाहेर पडेल. इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाविरुद्ध प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
इंग्लंड (प्लेइंग इलेव्हन): जॉनी बेअरस्टो, डेविड मलान, जो रूट, बेन स्टोक्स, जोस बटलर (कर्णधार/विकेटकीपर), मोईन अली, लियाम लिव्हिंगस्टोन, ख्रिस वोक्स, डेव्हिड विली, आदिल रशीद, मार्क वुड
ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): डेव्हिड वॉर्नर, ट्रॅव्हिस हेड, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लॅबुशेन, जोश इंग्लिस (विकेटकीपर), कॅमेरॉन ग्रीन, मार्कस स्टॉइनिस, पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, अॅडम झाम्पा, जोश हेझलवूड