Ben Stokes Back In ODI: न्यूझीलंडविरुद्ध इंग्लंड संघ जाहीर, निवृत्तीनंतर बेन स्टोक्सचे वनडेत पुनरागमन
इंग्लंडचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स निवृत्तीनंतर एकदिवसीय क्रिकेटमध्ये परतला आहे. गेल्या वर्षी बेन स्टोक्सने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. पण आता बेन स्टोक्स पुनरागमनासाठी सज्ज झाला आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी इंग्लंड संघाची घोषणा करण्यात आली आहे. इंग्लंडचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स (Ben Stokes) निवृत्तीनंतर एकदिवसीय क्रिकेटमध्ये परतला आहे. गेल्या वर्षी बेन स्टोक्सने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. पण आता बेन स्टोक्स पुनरागमनासाठी सज्ज झाला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी इंग्लंडने बेन स्टोक्सचा संघात समावेश केला आहे. बेन स्टोक्सने शेवटचा वनडे जुलै 2022 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला होता. बेन स्टोक्सने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 2924 धावा केल्या आहेत तसेच 74 विकेट्स घेतल्या आहेत.
न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय मालिकेसाठी इंग्लंड संघ: जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, गस ऍटकिन्सन, जॉनी बेअरस्टो, सॅम करन, लियाम लिव्हिंगस्टोन, डेविड मलान, आदिल रशीद, जो रूट, जेसन रॉय, बेन स्टोक्स, रीस टोपले, डेव्हिड विली, मार्क वुड, ख्रिस वोक्स
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)