IND vs ENG 1st Test Day 4 Live Score Update: इंग्लंडने दुसऱ्या डावात केल्या 420 धावा, भारतासमोर 231 धावांचे लक्ष्य
दुसऱ्या डावात इंग्लडंचा संघ 420 धावावर ऑलआऊट झाला आहे. आता भारताला हा सामना जिंकण्यासाठी 231 धावा करायच्या आहेत.
IND vs ENG 1st Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना हैदराबादच्या राजीव गांधी क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. चौथ्या दिवसाचा खेळाला सकाळी साडेनऊ वाजता सुरूवात झाली आहे. दुसऱ्या डावात इंग्लडंचा संघ 420 धावावर ऑलआऊट झाला आहे. आता भारताला हा सामना जिंकण्यासाठी 231 धावा करायच्या आहेत. तत्पूर्वी, इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या इंग्लंडचा संपूर्ण संघ 64.3 षटकांत केवळ 246 धावा करू शकला. इंग्लंडकडून कर्णधार बेन स्टोक्सने सर्वाधिक 70 धावा केल्या. टीम इंडियाकडून रवींद्र जडेजा आणि आर अश्विनने प्रत्येकी सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. पहिल्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या टीम इंडियाचा डाव 121 षटकात 436 धावांवरच मर्यादित राहिला. टीम इंडियाने 190 धावांची आघाडी घेतली होती. टीम इंडियासाठी अनुभवी अष्टपैलू रवींद्र जडेजाने सर्वाधिक 87 धावा केल्या. इंग्लंडकडून जो रूटने सर्वाधिक चार विकेट घेतल्या.