England Test Team For India Announced: भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंडने संघ केला जाहीर, या खेळाडूंना मिळाले स्थान
या 16 सदस्यीय संघात अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. पहिला कसोटी सामना 25 ते 29 जानेवारी दरम्यान हैदराबादमध्ये खेळवला जाणार आहे.
IND vs ENG Test Series 2024: पुढील वर्षी जानेवारी-फेब्रुवारीमध्ये भारताविरुद्ध होणाऱ्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंडने संघ जाहीर केला आहे. बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखाली इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. या 16 सदस्यीय संघात अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. पहिला कसोटी सामना 25 ते 29 जानेवारी दरम्यान हैदराबादमध्ये खेळवला जाणार आहे. शोएब बशीर आणि टॉम हार्टले यांना कसोटी संघात स्थान देण्यात आले आहे. (हे देखील वाचा: Virat Kohli Stats: विराट कोहलीने टीम इंडियासाठी एका कॅलेंडर वर्षात केल्या सर्वाधिक 1000+ विजयी धावा, येथे पाहा 'रन मशीन'ची आश्चर्यकारक आकडेवारी)
इंग्लंड संघ:
बेन स्टोक्स (कर्णधार), रेहान अहमद, जेम्स अँडरसन, गस ऍटकिन्सन, जॉनी बेअरस्टो, शोएब बशीर, हॅरी ब्रूक, जॅक क्रॉली, बेन डकेट, बेन फॉक्स, टॉम हार्टले, जॅक लीच, ऑली पोप, ऑली रॉबिन्सन, जो रूट, मार्क वुड .
कसोटी मालिकेचे वेळापत्रक:
पहिली कसोटी: भारत विरुद्ध इंग्लंड, 25-29 जानेवारी, हैदराबाद
दुसरी कसोटी: भारत विरुद्ध इंग्लंड, 2-6 फेब्रुवारी, विझाग
तिसरी कसोटी: भारत विरुद्ध इंग्लंड, 15-19 फेब्रुवारी, राजकोट
चौथी कसोटी: भारत विरुद्ध इंग्लंड, 23-27 फेब्रुवारी, रांची
पाचवी कसोटी: भारत विरुद्ध इंग्लंड, 7-11 मार्च, धर्मशाला
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)