ENG Playing11 vs IND 2nd Test: भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडने प्लेइंग 11 केली घोषणा, जेम्स अँडरसनचे संघात पुनरागमन
2 फेब्रुवारीपासून विशाखापट्टणम येथे सुरू होणाऱ्या कसोटी सामन्यासाठी अँडरसन व्यतिरिक्त इंग्लंडने शोएब बसीरचा समावेश त्यांच्या प्लेइंग 11 मध्ये केला आहे. फिरकीपटू जॅक लीचच्या दुखापतीनंतर बसीरला पदार्पणाची संधी देण्यात आली आहे.
IND vs ENG 2nd Test: विशाखापट्टणम येथे होणाऱ्या भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडने आपली प्लेइंग 11 घोषणा केली आहे. मुख्य वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनचे संघात पुनरागमन झाले आहे. संपूर्ण प्लेइंग 11 मध्ये दोन मोठे बदल करण्यात आले आहेत. दोन्ही बदल गोलंदाजीत झाले आहेत. 2 फेब्रुवारीपासून विशाखापट्टणम येथे सुरू होणाऱ्या कसोटी सामन्यासाठी अँडरसन व्यतिरिक्त इंग्लंडने शोएब बसीरचा समावेश त्यांच्या प्लेइंग 11 मध्ये केला आहे. फिरकीपटू जॅक लीचच्या दुखापतीनंतर बसीरला पदार्पणाची संधी देण्यात आली आहे. तर, अँडरसनच्या पुनरागमनामुळे मार्क वुडला वगळण्यात आले आहे.
दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडचे प्लेइंग इलेव्हन: जॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फॉक्स, रेहान अहमद, टॉम हार्टले, शोएब बशीर, जेम्स अँडरसन.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)