DC Beat LSG, IPL 2024 26th Match Live Score Update: दिल्लीनं दिला लखनौला घरच्या मैदानावर पहिला पराभवाचा धक्का, जेक फ्रेझर-मॅकगर्कची तुफानी खेळी
दिल्लीसाठी आजचा विजय हा महत्त्वाचा असून या विजयाने त्यांनी स्पर्धेतील आवाहन कायम ठेवले आहे.
दिल्ली कॅपिटल्सने आज लखनौ सुपर जायंट्सला त्यांच्याच घरच्या मैदानावर पहिला पराभवाचा धक्का दिला. दिल्लीने लखनौचे 167 धावांचे आव्हान 4 फलंदाजांच्या मोबदल्यात 19 व्या षटकात पार केलं. दिल्लीकडून जॅक फ्रासरे मॅगर्कने 55 धावांची अर्धशतकी खेळी केली. तर रिषभ पंतने 24 चेंडूत 41 धावा करत त्याला चांगली साथ दिली. पृथ्वी शॉने देखील 32 धावा करत चांगली सुरूवात करून दिली होती.
पाहा पोस्ट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)