IPL 2024 पूर्वी CSK च्या चाहत्यांना मोठा धक्का, MS Dhoni च्या जागी 'हा' खेळाडू होणार कर्णधार

CSK New Captain: आयपीएल 2024 शुक्रवारपासून सुरू होत आहे. दरम्यान, चेन्नई सुपर किंग्जने धक्कादायक निर्णय घेत चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे. वास्तविक, प्रत्येक सीझनप्रमाणेच आयपीएल सुरू होण्यापूर्वी सर्व संघांचे कर्णधार ट्रॉफीसोबत फोटोशूट करतात. या हंगामातही असेच घडले, जिथे सर्व 10 संघांच्या कर्णधारांना फोटोशूटसाठी बोलावण्यात आले होते. यावेळी चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनी या फोटोमध्ये दिसला नाही. त्याच्या जागी संघाचा युवा सलामीवीर ऋतुराज गायकवाडला पाठवण्यात आले. गायकवाड या हंगामात संघाचे नेतृत्व करणार असल्याचे आता सीएसकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement