Ind vs NZ Live Streaming: भारत आणि न्यूझीलंडमधील सामना कोठे पाहणार या प्रश्नाने क्रिकेट चाहते होते चिंतेत, टीव्हीवर विनामूल्य DD Sports प्रसारित करणार सामना

क्रिकेट चाहते चिंतेत होते की टीव्हीवर सामना कुठे पाहयला मिळणार पण मात्र बुधवारी संध्याकाळी उशिरा भारतीय चाहत्यांसाठी त्याचीही व्यवस्था करण्यात आली. या मालिकेतील सर्व सामने आता भारतातील डीडी स्पोर्ट्स वाहिनीवर पाहता येतील.

IND vs NZ (Photo Credit - Twitter)

टीम इंडिया सध्या न्यूझीलंडच्या (IND vs NZ) दौऱ्यावर आहे. भारतीय संघाला तेथे तीन सामन्यांची टी-20 आणि एकदिवसीय मालिका खेळायची आहे. टी-20 मालिकेतील (T20 Series) पहिला सामना शुक्रवार 18 नोव्हेंबरपासून खेळवला जाणार आहे. या दरम्यान, क्रिकेट चाहते चिंतेत होते की टीव्हीवर सामना कुठे पाहयला मिळणार पण मात्र बुधवारी संध्याकाळी उशिरा भारतीय चाहत्यांसाठी त्याचीही व्यवस्था करण्यात आली. या मालिकेतील सर्व सामने आता भारतातील डीडी स्पोर्ट्स वाहिनीवर पाहता येतील. डीडी स्पोर्ट्सने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून याबाबत माहिती दिली. या मालिकेचा आनंद डीडी स्पोर्ट्स (फ्री डिश आणि इतर डिश नेटवर्क) वर घेता येईल, असे त्यात म्हटले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement