CSK vs PBKS Live Score Update: चेन्नई सुपर किंग्जचा सलामीवीर डेव्हन कॉनवेने ठोकले अर्धशतक, पंजाब किंग्ज दुसऱ्या विकेटच्या शोधात
दोन्ही संघांमधील हा सामना चेन्नईच्या होम एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला जात आहे. हा सामना जिंकून CSK संघाला पुन्हा एकदा गुणतालिकेत अव्वल स्थान गाठायचे आहे. दुसरीकडे पंजाब किंग्ज संघ प्लेऑफमध्ये जाण्याची आशा कायम ठेवू इच्छितो.
इंडियन प्रीमियर लीगच्या 16व्या हंगामातील 41वा सामना आज चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज यांच्यात खेळला जात आहे. दोन्ही संघांमधील हा सामना चेन्नईच्या होम एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला जात आहे. हा सामना जिंकून CSK संघाला पुन्हा एकदा गुणतालिकेत अव्वल स्थान गाठायचे आहे. दुसरीकडे पंजाब किंग्ज संघ प्लेऑफमध्ये जाण्याची आशा कायम ठेवू इच्छितो. जरी दोन्ही संघ त्यांच्या मागील सामन्यात हरले आहेत. दोन्ही संघ चांगल्या लयीत दिसत आहेत. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत होणार आहे. दरम्यान, चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या चेन्नई सुपर किंग्ज संघाचा सलामीवीर डेव्हन कॉनवेने ३३ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. चेन्नई सुपर किंग्ज संघाचा स्कोर 125/1.