TATA IPL 2025 Points Table Update: दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करुन बंगळुरु पहिल्या स्थानी विराजमान, येथे पाहा अपडेटेड पॉइंट टेबल
बंगळुरुने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या दिल्ली कॅपिटल्सने 20 षटकात 8 गडी गमावून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसमोर 163 धावांचे लक्ष्य दिले. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या आरसीबीने 4 गडी गमावून लक्ष्य गाठले.
DC vs RCB, TATA IPL 2025 46th Match: इंडियन प्रीमियर लीग 2025 चा 46 वा सामना आज म्हणजेच 27 एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (DC vs RCB) यांच्यात दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला गेला. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दिल्ली कॅपिटल्सचा सहा गडी राखून पराभव केला आहे. त्याआधी, बंगळुरुने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या दिल्ली कॅपिटल्सने 20 षटकात 8 गडी गमावून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसमोर 163 धावांचे लक्ष्य दिले. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या आरसीबीने 4 गडी गमावून लक्ष्य गाठले. या दमदार विजयानंतर आरसीबीने पॉइंट टेबलमध्ये पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे. तर दिल्लीने चोथ्या स्थानावर आहे. तसेच मुंबई दुसऱ्या आणि गुजरात तिसऱ्या स्थानावर आहे.
येथे पाहा पॉइंट टेबल
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)