Bangladesh Squad for T20 Series: वेस्ट इंडिजविरुद्ध टी-20 मालिकेसाठी बांगलादेशचा संघ जाहीर, नजमुल हुसेन शांतोच्या जागी लिटन दासकडे संघाचे नेतृत्व
बांगलादेश सध्या वेस्ट इंडिजविरुद्ध 3 सामन्यांची वनडे मालिका खेळत आहे. ज्यात बांगलादेशला 2-0 अशा पराभव स्वीकारवा लागला आहे. 3 टी-20 सामन्यांची मालिका 15 डिसेंबरपासून सुरू होणार आहे.
West Indies Cricket Team vs Bangladesh National Cricket Team T20I Series 2024: वेस्ट इंडिज आणि बांगलादेश यांच्यात 3 सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जाणार आहे, ज्यासाठी बांगलादेश क्रिकेट बोर्डाने संघ जाहीर केला आहे. बांगलादेश सध्या वेस्ट इंडिजविरुद्ध 3 सामन्यांची वनडे मालिका खेळत आहे. ज्यात बांगलादेशला 2-0 अशा पराभव स्वीकारवा लागला आहे. 3 टी-20 सामन्यांची मालिका 15 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. यष्टिरक्षक फलंदाज लिटन दासकडे 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेची कमान सोपवण्यात आली आहे. संघाचा नियमित कर्णधार नजमुल हुसेन शांतो सध्या दुखापतीतून सावरत आहे. अशा परिस्थितीत संघाची कमान लिटन दासकडे सोपवण्यात आली आहे.
वेस्ट इंडिजविरुद्ध टी-20 मालिकेसाठी बांगलादेशचा संघ
लिटन कुमार दास (कर्णधार), सौम्या सरकार, तनजी हसन तमीम, परवेझ हुसैन आमोन, अफिफ हुसैन, मेहदी हसन मिराज, झेकर अली अनिक, शमीम हुसेन पटवारी, शेख महेदी हसन, रिशाद हुसेन, नसुम अहमद, तस्किन अहमद, तन्झीम हसन साकीब, हसन महमूद, रिपन मंडोल.