IND vs AUS: भारताविरुद्धच्या दोन कसोटी पराभवानंतर ऑस्ट्रेलियन कर्णधार परतला मायदेशी, जाणून घ्या काय आहे कारण
भारत दौऱ्यावर आलेल्या कांगारू संघाला सलग 2 कसोटी सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. पाहुण्या संघाने दोन्ही कसोटी 3 दिवसांतच शरणागती पत्करल्या.
ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) कर्णधार पॅट कमिन्स (Pat Cummins) भारताविरुद्धच्या सलग दोन कसोटीत पराभवानंतर ऑस्ट्रेलियात परतत आहे. वैयक्तिक कारण सांगून कमिन्सने मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला आहे. भारत दौऱ्यावर आलेल्या कांगारू संघाला सलग 2 कसोटी सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. पाहुण्या संघाने दोन्ही कसोटी 3 दिवसांतच शरणागती पत्करल्या. बॉर्डर गावस्कर ट्रॉफी अंतर्गत जाहीर झालेल्या या 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय संघ 2-0 ने पुढे आहे. मालिकेतील तिसरा कसोटी सामना 1 मार्चपासून इंदूरच्या होळकर स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. 29 वर्षीय पॅट कमिन्स तिसऱ्या कसोटीपूर्वी भारतात परतला नाही तर इंदूर कसोटी सामन्यात स्टीव्ह स्मिथ ऑस्ट्रेलियाची कमान सांभाळू शकतो.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)