IRE vs IND 3rd T20I: तिसरा टी-20 पावसामुळे रद्द, टीम इंडियाने मालिका 2-0 ने जिंकली
नियमानुसार निर्धारित वेळेपर्यंत पाऊस थांबला नाही, त्यामुळे सामना रद्द करण्यात आला. भारतीय संघाने याआधीच सलग 2 सामने जिंकून मालिका 2-0 अशी जिंकली होती.
भारत आणि आयर्लंड (IND vs IRE) यांच्यातील मालिकेतील शेवटचा तिसरा टी-20 सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. हा सामना डब्लिनमधील द व्हिलेज येथे खेळवला जाणार होता, परंतु वेळेवर पाऊस सुरू झाला, त्यामुळे नाणेफेक होऊ शकली नाही. नियमानुसार निर्धारित वेळेपर्यंत पाऊस थांबला नाही, त्यामुळे सामना रद्द करण्यात आला. भारतीय संघाने याआधीच सलग 2 सामने जिंकून मालिका 2-0 अशी जिंकली होती. टीम इंडियाने पहिला सामना 2 धावांनी तर दुसरा सामना 33 धावांनी जिंकला होता. (हे देखील वाचा: ICC Men’s Cricket World Cup 2023: विश्वचषक 2023 साठी BookMyShow वर बुक करता येणार तिकिटे; जाणून घ्या कधी होणार उपलब्ध)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)