Uddhav Thackeray Meets CM Devendra Fadnavis: उद्धव ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट; आदित्य ठाकरेही होते उपस्थित
या बैठकीनंतर राज्यातील राजकीय तापले आहे. त्यावरून अनेक राजकीय अर्थ काढले जात आहेत. मात्र बैठकीनंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना ही केवळ सदिच्छा भेट होती असे सांगितले.
Uddhav Thackeray Meets CM Devendra Fadnavis: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मंगळवारी पहिली भेट झाली. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे 15 मिनिटे चर्चा झाली. सूत्रांवर विश्वास ठेवायचा झाल्यास, यावेळी उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले. यासोबतच त्यांनी विधानसभेतील विरोधी पक्षनेत्याशी चर्चा केली. उद्धव ठाकरे फडणवीसांना भेटायला आले तेव्हा आदित्य ठाकरे आणि वरळीतून विजयी झालेले वरुण सरदेसाई यांच्याशिवाय माजी मंत्री आणि आमदार अनिल परब उपस्थित होते. फडणवीस यांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचीही भेट घेतली. नार्वेकर यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला शिवसेनेतून सुरुवात केली.
हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी उद्धव ठाकरे विधिमंडळात पोहोचले, तिथे त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या बैठकीनंतर राज्यातील राजकीय तापले आहे. त्यावरून अनेक राजकीय अर्थ काढले जात आहेत. मात्र बैठकीनंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना ही केवळ सदिच्छा भेट होती असे सांगितले. देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तेव्हा फडणवीस यांनी उद्धव यांना फोन केला होता. त्यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण दिले. मात्र, उद्धव ठाकरे फडणवीस यांच्या शपथविधीला उपस्थित राहिले नाहीत. ठाकरे यांनी फोनवरच त्यांचे अभिनंदन केले होते. (हेही वाचा: Maharashtra Cabinet Expansion: ‘जहाँ नहीं चैना, वहाँ नहीं...'; मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने Chhagan Bhujbal यांचे राष्ट्रवादी सोडण्याचे संकेत, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण)
उद्धव ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)