Mumbai Rains: मुंबईच्या एसी डबल डेकर बस वर पहिल्याच पावसाळ्यात कोसळलं झाड; सुदैवाने जीवित, वित्तहानी नाही
दक्षिण मुंबईमध्ये विशिष्ट मार्गांवरच ही AC Double Decker बस चालवली जाते.
मुंबईची खास ओळख असलेली डबलडेकर बस काही महिन्यांपूर्वीच दक्षिण मुंबईत एसी डबलडेकरच्या नव्या रूपात दाखल झाली आहे. या वर्षीचा पावसाळा हा या एसी डबलडेकरचा पहिला पावसाळा आहे. मुंबईच्या पावसात यंदा या बस वर झाड कोसळलं आहे. पण सुदैवाने त्यामध्ये कोणतीही जीवित किंवा वित्त हानी झालेली नाही. दक्षिण मुंबईमध्ये विशिष्ट मार्गांवरच ही बस चालवली जाते. Mumbai Andheri Landslide: मुंबईतील अंधेरी परिसरात इमारतीवर दरड कोसळली, कोणतेही जीवितहानी नाही .
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)