Mumbai Rains: मुंबई मध्ये पहाटेपासून मुसळधार, सखल भागात साचलं पाणी; रेल्वे सेवा सुरळीत

पाणी साचल्यामुळे अंधेरी सबवे बंद करण्यात आला आहे,वाहतूक विलेपार्ले पूल आणि कॅप्टन गोरे मार्ग एस. व्ही रोडकडे वाहतूक वळवण्यात आली आहे.

Mumbai Rain | Twitter

मुंबई मध्ये पहाटेपासून पावसाचा जोर वाढला आहे. अधून मधून जोरदार सरी बसरत आहेत त्यामुळे सखल भागात पाणी साचले आहे. अंधेरी सबवे, सायन भागात पाणी साचल्याचं चित्र आहे. त्यामुळे पाण्यातून वाट काढत सकाळी अनेक चाकरमनी बाहेर पडले आहेत. मुंबईची लाईफ लाईन समजली जाणारी मुंबई लोकल सेवा देखील तिन्ही मार्गांवर सुरळीत सुरू असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.  मुंबई मध्ये 70-100 मीमी पाऊस झाल्याची माहिती आयएमडी कडून देण्यात आली आहे. तरीही कामावर जाणार्‍यांनी काळजी घेण्याचं आवाहन केले आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now