'औरंगजेबाचे फोटो झळकवणे मान्य नाही, कोणी औरंग्याचे नाव घेत असेल तर त्याला माफी नाही'- Devendra Fadnavis
रविवारी रात्री ही घटना घडल्याची माहिती समोर येत आहे. एका उरूसादरम्यान चादर अर्पण करण्यासाठी मिरवणूक काढली गेली होती. या मिरवणुकीत औरंगजेबाचे फोटो झळकले.
अहमदनगर शहरातील फकीरवाडा भागात काही तरुण औरंगजेबाचे फोटो घेऊन नाचत असल्याचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. रविवारी रात्री ही घटना घडल्याची माहिती समोर येत आहे. एका उरूसादरम्यान चादर अर्पण करण्यासाठी मिरवणूक काढली गेली होती. या मिरवणुकीत औरंगजेबाचे फोटो झळकले. आता त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस म्हणाले, ‘औरंगजेबाचे फोटो जर कोणी झळकवत असेल तर ते इथे मान्य केले जाणार नाही. भारतात आणि विशेषत: महाराष्ट्रात आमचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराजच आहेत. कोणी औरंग्याचे नाव घेत असेल, तर त्याला माफी नाही.’ (हेही वाचा: शिवसेना ठाकरे गट "आवाज कुणाचा" नावाचा पॉडकास्ट करणार सुरु, जनतेच्या मनातील प्रश्न मांडणार)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)