Shivsena Podcast: शिवसेना ठाकरे गट "आवाज कुणाचा" नावाचा पॉडकास्ट करणार सुरु, जनतेच्या मनातील प्रश्न मांडणार
शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी या पॉडकास्टची माहिती आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन दिली.
शिवसेनेचा ठाकरे गट लवकरच आवाज कुणाचा या नव्या पॉडकास्टचे प्रसारण करणार आहे. शिवसेनेच्या अधिकृत युट्यूब चॅनलवर या पॉडकास्टचे प्रसारण होणार आहे. ठाकरे गट जनतेच्या मनातील प्रश्न या पॉडकास्टमधून मांडणार आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे पॉडकास्ट शिवसेनेकडून सुरु करण्यात येणार आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी या पॉडकास्टची माहिती दिली.
पाहा ट्विट -
लवकरच घेऊन येत आहोत,
जनतेच्या मनातले प्रश्न आणि त्यांची थेट उत्तरं...
'शिवसेना पॉडकास्ट' स्वरुपात!
"आवाज कुणाचा!"
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) अधिकृत युट्युब पेजवर.https://t.co/hKCteKYfxy pic.twitter.com/avf1EhBNrJ
— Aaditya Thackeray (@AUThackeray) June 5, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 05, 2023 06:52 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

