Illegal Encroachment: आयएएस प्रशिक्षणार्थी Puja Khedkar च्या पुण्यातील घरावर मोठी कारवाई; बेकायदेशीर अतिक्रमण तोडले (Watch Video)

तिच्या निवासस्थानावरील बेकायदा बांधकाम प्रशासनाने हटवले आहे.

Illegal Encroachment

Illegal Encroachment: महाराष्ट्रातील प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकरबद्दल रोज नवनवीन खुलासे होत आहेत. याआधी बनावट कागदपत्रांचा वापर करून अपंगत्व प्रमाणपत्र मिळवल्याचा आरोप पूजावर झाला होता. याबाबत तिच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. आता पूजाच्या पुण्यातील निवासस्थानावरील बेकायदा अतिक्रमणाची बाबही समोर आली असून, त्याविरोधात बुधवारी कारवाई करण्यात आली. तिच्या निवासस्थानावरील बेकायदा बांधकाम प्रशासनाने हटवले आहे. याबाबतचा एक व्हिडिओ समोर आला असून, त्यामध्ये पूजाच्या घराची सीमा भिंत तुटल्याचे दिसत आहे. दरम्यान, वादात अडकल्यानंतर, उत्तराखंडमधील मसुरी येथील लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीने पूजा खेडकरचा प्रशिक्षण कार्यक्रम रद्द केला आहे. खेडकरवर पुण्यातील पोस्टिंगदरम्यान विशेष अधिकाराचा गैरवापर केल्याचा आरोपही आहे. (हेही वाचा: Pune Crime: स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून 66 लाखांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला पुण्यातून अटक)

पहा व्हिडिओ- 



संबंधित बातम्या

Supreme Court Rebuked Yogi govt: महाराजगंज येथील बुलडोझर कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाने योगी सरकारला फटकारले, पीडितेला २५ लाख रुपये देण्याचे दिले आदेश

Singham Again Review: अजय देवगण स्टारर 'सिंघम अगेन' हा चित्रपट ॲक्शन, विनोद आणि भारतीय पौराणिक कथा यांचे रोमांचक मिश्रण, जाणून घ्या, अधिक माहिती

Maharashtra Assembly Elections 2024: चांदिवलीचे आमदार दिलीप लांडे यांची मोफत ज्युसर मिक्सर देण्याची घोषणा; आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याने मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी दिले कारवाईचे आदेश

Maharashtra Assembly Polls 2024: लोकसभेत पराभव झाल्यानंतर पूजा खेडकरचे वडील Dilip Khedkar विधानसभेची निवडणूक लढवणार; उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर निर्माण झाला नवा वाद