Gadchiroli: महाराष्ट्र आणि छत्तीसगडला जोडणार्‍या क्रांतिवीर बाबूराव शेडमाके-कोठी कोरनार पुलाचे DCM Devendra Fadnavis यांच्या हस्ते उदघाटन (Watch)

साधारण 16 गावातील 5000 लोकांचा बारामाही संपर्क अबाधित राहावा यासाठी हा पूल अत्यंत महत्त्वाचा आहे.

DCM Devendra Fadnavis

आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महाराष्ट्र आणि छत्तीसगडला जोडणार्‍या क्रांतिवीर बाबूराव शेडमाके-कोठी कोरनार पुलाचे उदघाटन करण्यात आले. या पुलाअभावी गडचिरोलीतील 16 गावे पावसाळ्यात पूर्णपणे संपर्कातून तुटत होती. या 16 गावातील 5000 लोकांचा बारामाही संपर्क अबाधित राहावा यासाठी हा पूल अत्यंत महत्त्वाचा आहे. यावेळी फडणवीस यांनी आदिवासी बांधवांशी संवादही साधला. याबाबत फडणवीस म्हणतात, ‘इथले एसपी सांगतात, गडचिरोलीतील इतक्या दुर्गम भागात येणारा मी पहिलाच आहे. आज दुपारी गावातील एका झाडाखाली बंधू भगिनींना भेटून थेट त्यांच्याशीच संवाद साधला. त्यांनी आपल्या समस्या आणि म्हणणे मांडले. तेथील रहिवाशांची पाण्याची आणि शेतीच्या इतर समस्या सोडविण्याचे आश्वासनही त्यांना दिले. आणि इतक्या दुर्गम भागातही अनेक घरांवर आपला तिरंगा बघून मन सुखावले.’ (हेही वाचा: Virtual Class Rooms in ITI: आयटीआयमध्ये सुरु झाल्या व्हर्च्युअल क्लासरूम्स; राज्य शासनाचा एक वर्षात 75 हजार नोकऱ्या देण्याचा संकल्प)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now